जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट, यामुळे उन्हाळी लागवड केलेले कांद्ये काढण्या आधीच कांदा जमिनीत
जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट, यामुळे उन्हाळी लागवड केलेले कांद्ये काढण्या आधीच कांदा जमिनीतच सडू लागला होता. उन्हाळी कांदा शेतकरी आता काढत आहे परंतु चांगल्या कांद्यापेक्षा सडका व खराब कांद्याची संख्या जास्त आहे. ज्या ठिकाणी 600 चा वरती कट्टे आले पाहिजे होते त्या ठिकाणी 240 कांद्याचे कट्टे येत आहे. खराब व सडलेला कांदा शेतात पडलेला आहे. तो शेतामध्ये बैलांना खाण्यासाठी सोडून दिलेला आहे. शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील यांचा याला खांदा आहे. संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय शेती मालाला भाव नसल्याने नेहमी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहे. परंतु आता त्यांच्यातच शेतात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याला खर्च मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे लागलेला खर्च त्याच्यापेक्षा उत्पन्न कमी येत असल्याने सरकारने हमीभाव द्यावा. अशी मागणी यावेळी शेतकरी संदीप पाटील यांनी केली आहे.
COMMENTS