मुंबई प्रतिनिधी - राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहे. परंतु आता अवकाळी पावसामुळे शेत

मुंबई प्रतिनिधी – राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहे. परंतु आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आला आहे. राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला असून कोकणालाही या पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
COMMENTS