Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

24 मार्चपासून पुन्हा पावसाची शक्यता

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे नुकसान मोठया प्रमाणावर झाले अस

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार ?
शेतक-यांना ठिबक सिंचन आता ७५ आणि ८० टक्के अनुदानावर मिळणार: दादाजी भुसे
महाबळेश्‍वर तहसिल कार्यालयाच्या परिसरात पांढर्‍या शेकरूचे दर्शन

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे नुकसान मोठया प्रमाणावर झाले असून, फळबागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांना, राज्यात पुन्हा एकदा 24 मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ होतांना दिसून येत आहे.
24 मार्चनंतर महाराष्ट्रात पुन्हा काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात दोन वेळा आलेल्या अवकाळीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. त्यातच पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकर्‍याने जगायचे कसे? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सध्या राज्यात रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळपासूनच पुणे, मुंबई आणि नवी मुंबईसह ठाण्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. असे असतांनाच, महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. सहसा दुपारी किंवा त्यानंतर हलक्या सरी दिसू शकतील, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रांचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी बोलताना सांगितले. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्राकडून येणार्‍या पश्‍चिमी वार्‍यांमुळे पाऊस कोसळत आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते ज्यामुळे मुंबई आणि उपनगरात आज पाऊस झाला. सहसा सकाळी वार्‍यांची दिशा ही पूर्वेकडून असते मात्र आज वार्‍यांची दिशा पश्‍चिमी होती आणि त्यामुळे पाऊस बघायला मिळाला. पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानात दोन ते तीन अंशांची घट बघायला मिळेल, असेही कांबळे यांनी सांगितले.

COMMENTS