पुणे प्रतिनिधी - श्री क्षेत्र आळंदीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका महाराजाने तीन विद्यार्थ्य

पुणे प्रतिनिधी – श्री क्षेत्र आळंदीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका महाराजाने तीन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने आळंदी आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर उर्फ आळंदीकर (वय ५२) असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी कलम भादवी ३७७ व पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दासोपंत महाराज मृदुंग वारकरी नावाची शिक्षण संस्था चालवतो. साधारण सत्तरहून अधिक विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचं धडे घेत आहेत. पण दिवाळीनंतर दासोपंत यांनी एका विद्यार्थ्याना ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत कोणाला सांगितल्यास बरे वाईट होईल असे त्याने धमकावले होते. विद्यार्थ्याला त्रास व्हायला लागल्या नंतर पालकांनी पोलिसात जाऊन याबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत संबधित महाराजाचे बिंग फुटले, ही घटना समजल्यानंतर आणखी दोन मुलांचे कुटुंब समोर आले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी महाराजाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
COMMENTS