Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मसूरच्या स्मशानभूमिची अज्ञाताकडून तोडफोड

मसूर / वार्ताहर : मसूर, ता. कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील बगीच्यामधील झाडांच्या कुंड्या कंपाऊंड फुलझाडांसह इतर सार्वजनिक मालमत्तांचे

दिसतोय बदल… होतोय विकास… पोस्टर्सची इस्लामपूरात चर्चा
महावितरणने ठेकेदारांची बिले थकवल्याने 20 फेब्रुवारीपासून ठेकेदारांचा बंदचा इशारा
ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना रत्नसिंधू जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मसूर / वार्ताहर : मसूर, ता. कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील बगीच्यामधील झाडांच्या कुंड्या कंपाऊंड फुलझाडांसह इतर सार्वजनिक मालमत्तांचे काही विध्वंसक प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विध्वंसक प्रवृत्तीचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. नुकसान प्रकरणी अज्ञातांविरोधात मसूर पोलीस दूरक्षेत्र तक्रार दाखल झाली आहे.
मसूरच्या उत्तरेला वैकुंठ स्मशानभूमी दशक्रिया विधीचे शेड आहे. या परिसरात बाकडे पेव्हर्स बसवले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात विविध प्रकारची फुलझाडे फळझाडे व इतर शोभेची झाडे लावली होती. त्यामुळे स्मशानभुमीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. या परिसरातील सर्व उगवण झालेल्या झाडांची नासधूस करून काही कुंड्या फोडून त्या अस्ताव्यस्त फेकण्यात आले आहेत. झाडांच्या भोवतीचे नेटची कुंपणे सुध्दा तोडून टाकली आहेत. काही ठिकाणचे झाडे उपटून टाकली आहेत. या प्रकार आज सकाळी लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलिसांना संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले. याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे एपीआय अजय गोरड मसूर दूरक्षेत्रचे पीएसआय महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आबा जगदाळे, के. एस. जाधव, पोलीस पाटील सौ तीलोत्तमा वेल्लाळ यांच्यावतीने पंचनामा करण्यात येऊन अज्ञात इसमाने विरोधात मसूर दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित विध्वंसक प्रवृत्तीच्या इसमांचा कसून शोध करण्यात येत आहे. अशा मनोविकृतीच्या विरोधात मसुरकरांनी आता कंबर कसली आहे. लवकरच अज्ञाताविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन ग्रामपंचायत व सभापती मानसिंगराव जगदाळे उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी दिली.
चौकटः निसर्गाचे बदलते चित्र लक्षात घेता झाडे लावा झाडे जगवा व त्याचे संगोपन करा, असे आवाहन करण्यात येते. तसेच कोरोनामुळे नैसर्गिक ऑक्सिजनची किंमत कळली झाडांचे महत्त्व लक्षात घेता ठिकाणी वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेण्यात येतात. मसूर पंचायतीने तर स्मशानभूमी परिसरात विविध फुल झाडे फळझाडे लावून बगीच्याचे स्वरूप आणले होते.

COMMENTS