Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू

डेहराडून: उत्तराखंड या राज्यात सोमवारपासून समान नागरा कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्र्य

कोरडवाहूला एकरी 25 तर बागायतीला 50 हजारांची मदत द्या
काँगे्रसचे बुडते जहाज
तिसरी लाटही जास्त प्राणघातक

डेहराडून: उत्तराखंड या राज्यात सोमवारपासून समान नागरा कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही घोषणा केली. मुख्यमंत्री धामी म्हणाले की हा खूप भावनिक क्षण आहे. 30 वर्षांपूर्वी राज्यातील जनतेला दिलेले वचन आम्ही पूर्ण केले. आमच्या टीमने समान नागरी कायद्यासाठी खूप मेहनतीने आणि कठोर परिश्रम केले.
यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समान नागरी संहिता उत्तराखंड- 2024 च्या अंमलबजावणीसाठी नियम आणि पोर्टलचे उद्घाटन केले. हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीमुळे समाजात एकरूपता येईल. राज्यातील सर्व नागरिकांना समान अधिकार आणि जबाबदार्‍या असतील. ते म्हणाले की, उत्तराखंड हे स्वतंत्र भारताचे पहिले राज्य ठरले आहे, जिथे हा कायदा प्रभावी झाला आहे. या कायद्यामुळे मुलगा आणि मुलगी दोघांनाही मालमत्तेत समान हक्क मिळतील. यासोबतच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, समान नागरी संहिता त्या व्यक्तीच्या मालमत्तेची जोडीदार आणि मुलांमध्ये समान वाटप करण्याचा अधिकार देते. याशिवाय त्या व्यक्तीच्या पालकांनाही मालमत्तेत समान हक्क मिळेल.

COMMENTS