Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लघुशंका करताना पाय घसरल्याने युवकाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू.

शुभम हातमोडे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव

नागपूर प्रतिनिधी - नाग नदीच्या काठावर उभे राहून लघुशंका करणे युवकाला चांगलेच महागात पडलं आहे. लघुशंका करताना पाय घसरल्याने युवकाचा नाग नदी मध्ये

साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन
देवळाली प्रवरातील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

नागपूर प्रतिनिधी – नाग नदीच्या काठावर उभे राहून लघुशंका करणे युवकाला चांगलेच महागात पडलं आहे. लघुशंका करताना पाय घसरल्याने युवकाचा नाग नदी मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम हातमोडे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम पाण्यात पडताच पाण्याचा वेग जास्त असल्याने तो पाण्यात दूर पर्यंत वाहत गेला. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडा ओरड केली मात्र शुभम तो पर्यंत वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. गायत्री मंदिर चौकात अग्निशमन विभागाने नदीला जाळी लाईन शुभम च्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.

COMMENTS