Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या नावाने उमेद मॉल सुरू करणार : पालकमंत्री विखे यांची घोषणा

अहिल्यानगर ः बचत गटानी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारेपठ उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उमेद मॉल सुरू करण्या

अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक
विद्युत  वितरणचा लहरी कारभार दीडशे गावे अंधारात
‘आवर्तन’चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात

अहिल्यानगर ः बचत गटानी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारेपठ उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उमेद मॉल सुरू करण्याची घोषणा जलसंपदा तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केली. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या साह्ययाने तालुका स्तरावरही असे मॉल सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि उमेद महाराष्ट्र जीवन्नोती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महीला बचत गटांच्या उत्पादित मालाचे विभागीय स्तरावरील साईज्योती सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर प्रकल्प संचालक राहूल शेळके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ विनायक देशमुख निखिल वारे आदि याप्रसंगी उपस्थित होते. या प्रदर्शानात 315 महीला बचत सहभागी झाले असून, वस्तू विक्रीचे 120 स्टॉल खाद्य पदार्थाचे 85स्टॉल जळगाव धुळे नासिक नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील 40 स्टॉल आहेत. उमेद योजनेतून मंजूर झालेल्या अनूदानाचे तसेच कर्जाच्या धनादेशाचे वितरण बचत गटांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष सुरू असताना विभागीय प्रदर्शन या जिल्ह्यात होणे हा मोठा योगायोग आहे. नारीशक्तीला विधायक कार्याकडे वळविण्यासाठी बचत गटाची चळवळ सुरू झाली. महीलांच्या अर्थिक सक्षमीकरणाचे मोठे काम झाले असून हजारो रुपायात होणारी अर्थिक उलाढाल आता लाखो रूपयापर्यत गेली गेली आहे.बॅकाकडून घेतलेल्या कर्जाचा शंभर टक्के वसूल बचत गटाचा असून केवळ विश्‍वासार्हतेवर चळवळीने मोठे यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणामुळे महीलांमधील उद्यमशीलता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यामुळे महीलांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. झिरो बॅलन्सवर बॅकामध्ये खात उघडण्याची संधी मिळालेल्या महीलांना द्रोण आणि लखपती दिदी बनवून अर्थिक उत्पन्नाचा मार्ग प्रधानमंत्र्यांनी मिळवून दिल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील महायुती सरकारने लखपती दिदी बनविण्याचे उद्दीष्ट्य ठेवले असून त्यावर काम सुरू केले असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यात महीला बचत गट आणि उमेद योजनेतून सुरू असलेल्या कामाची माहीती दिली. मंत्री विखे पाटील यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेटी देवून महीलांशी संवाद साधला.उत्पादित मालाच्या प्रक्रीयेची माहीती त्यांनी जाणून घेतली.


तालुका स्तरावर उमेद भवन उभारण्याचा मानस
बचत गटांना त्यांच्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी एक केंद्र असावे म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा स्तरावर उमेद भवन उभारण्याचे धोरण घेतले आहे. अहिल्यानगर येथे त्यांच्या नावानेच उमेद भवन उभारून बचत गटांना संधी देण्यात येईल टप्प्या टप्प्याने तालुका स्तरावर उमेद भवन उभारण्याचा मानस मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

COMMENTS