Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर राज्य सरकारला उपरती

मोकळ्या परिसरात दुपारी 12 ते 5 या वेळेत शासकीय कार्यक्रम नाही

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण उपचार घेत असतांना, अखेर राज्य सरकारला उप

अभिनेत्री शर्लिनला जीवे मारण्याची धमकी
कोलकाता संघात अचानक मोठा बदल
उत्तरप्रदेशमध्ये बॉम्ब बनवतांना स्फोट

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण उपचार घेत असतांना, अखेर राज्य सरकारला उपरती झाली असून, आता मोकळ्या परिसरात सर्व शासकीय कार्यक्रम हे 12 ते 5 या वेळेत न करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर, शेकडो रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नेत्यांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. 14 लोकांचा जीव गेल्यानंतर राज्यसरकारला जाग आली आहे. खारघर येथील दुर्घटनेनंतर कोणत्याही मोकळ्या जागेत 12 ते 5 या वेळेत कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने याबाबत नवा जीआर देखील काढला आहे.

COMMENTS