Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे ः राणे

मुंबई/प्रतिनिधी ः महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा असेल. यानंतर व

लोकमंथन व लोकन्यूज-24 ने केला कोरोना सेवाकार्याचा गौरव ; कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करणारे राज्यातील पहिले मराठी मिडिया हाऊस
सनी लिओनीचा न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर| फिल्मी मसाला | LokNews24 |
Tuljapur : नळदुर्ग येथील रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे | Loknews24

मुंबई/प्रतिनिधी ः महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा असेल. यानंतर वज्रमूठ सभा होणार नाही, असा दावा भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे ओझे झाले आहे. आणि हे ओझे किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचे हा एक प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
या टीकेला भाजपने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकावरुन नितेश राणे म्हणाले, एकाच दिवसात फरक पडेल असे वाटले नव्हते. संजय राऊत यांचा चेहरा आज उतरलेला होता. असे त्यांच्याशी लढण्यात मजा नाही. राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल कमी झाला. राऊत म्हणायचे मी पवारांचा माणूस आहे. हे उद्धव ठाकरेचे देखील नाहीत आणि शरद पवारांचे देखील नाहीत. मग हे राजकारणातले लावारीस आहेत का? नितेश राणे म्हणाले, राऊत म्हणाले की बारसूचे जे जमिनदार आहेत. त्यांच्या याद्या जाहीर करणार आहेत. तर काही याद्या आम्ही देखील जाहीर करु. माजी खासदार निलेश राणे यांनी काही नावे जाहीर केली होती. ज्यामध्ये ठाकरेंची देखील नावे होती. जर संजय राऊत आणि विनायक राऊत यांना आपल्या मालकाला अडचणीत आणायचेच असेल तर त्यांनी जरुर ही नावे जाहीर करावी. स्थानिकांना विश्‍वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. कारखान्यांच्या चौकशीवरुन पवार कुटुंबीयांना अडचणी आणण्याचा प्रयत्न. नितेश राणे म्हणाले, संजय राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. तो शिवसैनिक असण्याच्या बाता करतो. त्याला शिवसेनेबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हा चायनिज मॉडेल आहे. ओरिजनल नाही. लोकप्रभात असताना बाळासाहेबांना शिव्या घालायचे. संजय राऊत म्हणतात कि, शिवसेनेचा जन्म 1969 मध्ये झाला. शिवसेनेचा जन्म 19 जून 1966 मध्ये झालेला आहे. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहित नाही, तो आम्हाला शिवसेनेबद्दल शिकवत आहे. राऊत डुप्लिकेट आहे. नितेश राणे म्हणाले, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक शिवसेना नाव वापरत आहेत. हा निवडणुक आयोगाच्या निर्णयाचा अपमान आहे. तुम्ही शिवसेना म्हणू शकत नाही. तुम्हाला ठाकरे गट म्हणावे लागेल. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष नाही. याबाबत निवडणुक आयोगाकडे तक्रार करावी यासाठी शिंदे साहेबांशी बोलणार आहे.

COMMENTS