Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची पुन्हा पक्षप्रमुखपदी होणार निवड

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिकार्‍यांची बैठक 1

ठाकरे कुटुंबियांच्या कथित संपत्तींची प्राथमिक चौकशी सुरु
महाराष्ट्रात काका- पुतण्या संघर्षाचा नवा अध्याय.. पुतण्याने साधला निशाणा
शिवसेना भवन, पक्षाची संपत्ती ठाकरेंकडेच

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिकार्‍यांची बैठक 18 जून रोजी मुंबईत होत आहे. शिवसेना फुटीनंतर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपली होती. त्यानंतर प्रथमच ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटातर्फे पावले उचलली जात आहेत.

COMMENTS