Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेच्या विजयावर डाग, संघर्षाच्या पराभवाला तेज ; उद्धव ठाकरेंचा सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल

मुंंबई ः मुंबईतील 29 महानगरपालिकांच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स

धनशक्तीच्या दबावासमोरही शिवसेनेची लढत अखंड
महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये अवतरले महिला-राज !
निवडणूक आयोगाकडून जनतेची दिशाभूल

मुंंबई ः मुंबईतील 29 महानगरपालिकांच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी महायुतीवर कडाडून टीका केली. या निवडणुका सत्ताधार्‍यांनी लोकशाही मूल्यांना तिलांजली देत खेळवल्या, असा आरोप करत आमचा पराभव तेजस्वी आहे, मात्र त्यांचा विजय संशयाच्या छायेत आहे, असे परखड मत त्यांनी मांडले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधार्‍यांनी ही निवडणूक केवळ सत्ता टिकवण्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न बनवला. साम, दाम, दंड, भेद याच्या चौकटी ओलांडून दबाव, पैशांचे आमिष, नोटिसा, अटक, तडीपारी आणि दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. तरीही या सार्‍या दडपशाहीला न जुमानता जे उमेदवार लढले आणि जे मतदार निर्भयपणे मतदानाला उभे राहिले, तेच खरे लोकशाहीचे रक्षक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आपण सर्व महापालिकांच्या प्रचाराला जाऊ शकलो नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मात्र चंद्रपूर, परभणीसह अनेक ठिकाणी शिवसेनेने समाधानकारक कामगिरी केल्याचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले. जिथे मी पोहोचू शकलो नाही, तिथल्या शिवसैनिकांनीही ताकदीने लढत दिली, असे ते म्हणाले. मुंबईत महापौरपद मिळवण्याचे स्वप्न सध्या अपूर्ण राहिले असले, तरी सत्ताधार्‍यांच्या सर्व प्रयत्नांनंतरही शिवशक्तीने मिळवलेले यश त्यांना अस्वस्थ करणारे आहे, असा टोला त्यांनी लगावला. शिवाजी पार्कवरील सभेला उसळलेली गर्दी आणि त्यानंतर महायुतीच्या सभेला दिसलेली मरगळ याचा संदर्भ देत, मग मतदान खुर्च्यांनी केलं का? असा सवाल करत त्यांनी उपरोधिक टीका केली. पैशांच्या वापरावरही उद्धव ठाकरे यांनी गंभीर प्रश्‍न उपस्थित केले. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आलेला पैसा, साहित्य आणि भेटवस्तू यांचा स्रोत काय, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. जर एवढा पैसा खुलेआम वापरला जात असेल, तर ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांची चौकशी कुठे आहे? असा थेट सवाल करत त्यांनी नोटबंदीच्या उद्दिष्टांवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

COMMENTS