Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उध्दव महाराजांनी वडुलेचे नाव राज्यात पोहचवले

श्रीराम महाराज झिंजुर्के यांचे प्रतिपादन

शहरटाकळी ः सबलस परिवारामध्ये परंपरेने परमार्थ टिकवला आहे, आपल्या विनोद शैलीतुन उध्दव महाराजांनी वडुले परिसराच नाव महाराष्ट्रात पोहचवले पुढे हिच प

श्री खोलेश्‍वर देवस्थानची यात्रोत्सवाची कुस्त्यांच्या हंगाम्याने सांगता
दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी उपोषण : नय्युमभाई सुभेदार
ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम

शहरटाकळी ः सबलस परिवारामध्ये परंपरेने परमार्थ टिकवला आहे, आपल्या विनोद शैलीतुन उध्दव महाराजांनी वडुले परिसराच नाव महाराष्ट्रात पोहचवले पुढे हिच परंपरा अत्यंत सुंदर प्रकारे ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली महाराज चालवत असल्याचे प्रतिपादन श्रीराम महाराज झिंजुर्के. (सद्गुरू जोग महाराज सेवा संस्थान, आखेगाव) यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील सामणगाव येथे वारकरी भूषण ह. भ. प. उद्धव महाराज सबलस (वडुलेकर) यांचा 65 वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न यावेळी श्रीराम महाराज झिंजुर्के बोलत होते. या प्रसंगी सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या निमित्त प्रवीण महाराज गोसावी (श्री.संत एकनाथ महाराज वंशज) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. तसेच वै. तुकाराम भाऊ सबलस (पैठणकर) यांचा 25 वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा वारकरी रत्न पुरस्कार ह.भ.प. जनार्धन महाराज डमाळ यांना देण्यात आला. या प्रसंगी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमसाठी शेवगांव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार  मोनिकाताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जि. परिषद सदस्या  हर्षदाताई काकडे उपस्थित होते. तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के, ह.भ.प.अनिल महाराज वाळके, धर्मराज महाराज फुंदे, शिवाजी म.काळे तसेच महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार उपस्थित होते. ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज सबलस यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले व नंतर पुरणपोळीच्या महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS