मुंबई प्रतिनिधी - संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवरायांच्या अपमानानंतर कोश
मुंबई प्रतिनिधी – संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवरायांच्या अपमानानंतर कोश्यारींची हकालपट्टी व्हायला हवी होती. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही चुप्पी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यामुळे प्रताप गडावर जाऊन शिवरायांना वंदन करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. कार्यक्रम साताऱ्यात आहे, मात्र अजूनही उदयनराजे तिकडे गेले नसल्याचही राऊतांनी यावेळी म्हटलं
COMMENTS