Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळशिरस रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेत दोन तरूणांचा जागीच मृत्यू

छाया- अपघातग्रस्त वाहने तीनजण जखमी : माळशिरस पोलिसात गुन्हा दाखलगोंदवले / वार्ताहर : म्हसवड रस्त्यावर गोरडवाडी जवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक ह

सातारच्या 10 औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस
अजित दादांचे घड्याळ आता निशिकांत दादांच्या हाती ?
जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

तीनजण जखमी : माळशिरस पोलिसात गुन्हा दाखल
गोंदवले / वार्ताहर : म्हसवड रस्त्यावर गोरडवाडी जवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोघेजण ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले माळशिरस पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आबा खाडे वय 24, रा. धामणी, ता. माण, जि. सातारा व फिरोज शेख अवलीखोत (वय 23, रा. कणसेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत तर शामराव खाडे, धनाजी खाडे, दिपक खाडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकलूज येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत आबा गुलाब खाडे त्यांचा नातेवाईक शामराव खाडे हे दोघे मोटरसायकलवरून धामणीहुन मेडद, ता. माळशिळरस येथे नातेवाईकांकडे निघाले होते. तसेच मयत फिरोज शेख अवलीखोत हे धनाजी खाडे व दिपक खाडे हे तिघेजण मोटारसायकलवरून मेडद येथून कणसेवाडीकडे निघाले होते. या दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही मोटरसायकल चालविणार्‍यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील दोन्ही एकमेकांचे पाहुणे
मेडद, ता. माळशिरस येथे यात्रा सुरू आहे. यात्रेला पाहुण्यांकडुन घराकडे एक मोटरसायकल तर पाहुण्यांकडे जाण्यासाठी दुसरी मोटारसायकल येत होती. दरम्यान, दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. अपघाग्रस्त एकमेंकाचे पाहुणे असून यात्रेवरून येताना व जाताना हा अपघात झाला. यामुळे नातेवाईकांमधून शोक व्यक्त करत आहेत.

COMMENTS