Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोगलगावच्या दोन युवकाला टिप्परची धडक ; अपघातानंतर दोघे बंधू पाटात कोसळ्याने बेपत्ता

रात्री पासून शोधकार्य सुरुच बीड-जालना हायवेवरील घटना

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथील दोघे चुलत भाऊ आपल्या दुचाकीवरून जालना येथून परत गावी येत होते. दरम्यान बीड-जालना हायवेवरील प

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये 15 कोटींची वाढ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्याला यश
महावितरणच्या गुणवंत कर्मचाऱयांनी इतरांचे रोल मॉडेल व्हावे
मुंबईत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीने केली आत्महत्या

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथील दोघे चुलत भाऊ आपल्या दुचाकीवरून जालना येथून परत गावी येत होते. दरम्यान बीड-जालना हायवेवरील पैठणच्या उजव्या कालव्यावर त्यांची दुचाकी आली असता जालनाकडे जाणार्‍या भरधाव वेगातील टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही युवक कालव्यात पडले. तर अन्य एक जण भंगार घेऊन जात असलेल्या दुचाकीला देखील टिप्परची धडक बसल्याने तो जखमी झाला. हि घटना सोमवारी 5 वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलिस व ग्रामस्थांनी सदरील युवकांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दोघेही मिळून आले नसून रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरुच होते. युवराज संतोष गायकवाड (वय 20 वर्ष), महेश किशोर गायकवाड (वय 21 वर्ष) दोघे रा.भोगलगाव ता.गेवराई जि.बीड असे या युवकांचे नाव आहे
गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथील युवराज व किशोर हे दोघे नात्याने चुलत बंधू आहेत. हे दोघे जालना येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. दरम्यान सोमवारी ते जालना येथून आपल्या दुचाकीवरून भोगलगावला जात होते. त्यांची दुचाकी हि बीड-जालना हायवेवरील पैठणच्या डाव्या कालव्यावर आली असता जालनाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हे दोघे चुलत बंधू पाटात कोसळले. तर अन्य एका भंगार सामान घेऊन जात असलेल्या एका दुचाकीला टिप्परची धडक बसल्याने हा दुचाकीस्वार जखमी झाला. दरम्यान अपघातानंतर पाटात कोसळलेल्या दोन्ही युवकांना शोधण्यासाठी  नागरिकांनी धाव घेतली, मात्र दोघे मिळून आले नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने सदरील युवकांना शोधण्याचे कार्य सुरु केले. रात्री पासून पोलिसांची शोधकार्य मोहिम सुरुच आहे

COMMENTS