नगरमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर/प्रतोनिधी : नगरमध्ये दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतामधील कांद्याच्या शेडमध्ये गळफास लावून घेत गौतम ज्ञानदेव कापडे (वय 32 रा. नवन

मनपातील महाविकास आघाडीला बसणार झटका ; काँग्रेस आणणार मंगळवारी आसूड मोर्चा
सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांना जनता धडा शिकवते ः खासदार लंके
सुमन काळे मृत्यू प्रकरणी सक्षम वकील दिला जावा : काळे परिवाराचे राज्यपालांना साकडे

अहमदनगर/प्रतोनिधी : नगरमध्ये दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतामधील कांद्याच्या शेडमध्ये गळफास लावून घेत गौतम ज्ञानदेव कापडे (वय 32 रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) या तरुणाने आत्महत्या केली. बोल्हेगाव उपनगरात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. गौतमच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरी घटना दातरंगे मळ्यात घडली. येथील महेंद्र नागेश नामन (वय 23) याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने सिंलींग फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गौतम कापडे याचा बोल्हेगाव परिसरात पानटपरीचा व्यवसाय होता. तो विवाहित होता. त्याने शेतामधील कांद्याच्या शेडमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. नामन याच्याबाबत माहिती मिळाली नाही. जिल्हा रुग्णालयात या दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे व या दोन्ही आत्महत्यांच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.

COMMENTS