Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन महिला कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड

अकोले ः छत्रपती संभाजीनगर येथे 6 ते 7 एप्रिल 2024 दरम्यान होणार्‍या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती (महिला महाराष्ट्र केसरी) स्पर्धेत राजूर येथ

महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात
शरद पवारांची ‘कात्रजचा घाट दाखवणारी खेळी’ अनेकांना न उलगडणारी ! l पहा LokNews24
केडगाव परिसरात दहशत माजवणारा आरोपी जेरबंद l पहा LokNews24

अकोले ः छत्रपती संभाजीनगर येथे 6 ते 7 एप्रिल 2024 दरम्यान होणार्‍या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती (महिला महाराष्ट्र केसरी) स्पर्धेत राजूर येथील अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. शिंदे दामिनी दिगंबर (प्रथम वर्ष कला) 65 किलो वजन गटात निवड, व  सोनवणे दीक्षा शंकर (12 वी कॉमर्स) 59 किलो वजन गटात निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, बी. वाय. देशमुख यांनी दिली आहे. दामिनी व दीक्षा या भारतीय खेळ प्राधिकरण नव्वी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालय साई कुस्ती सेंटरमध्ये कुस्ती प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना विद्यालयातील शारिरीक शिक्षक विभाग प्रमुख प्रा. विकास नवले, व कुस्ती केंद्राचे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते  तानाजी नरके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांनी अभिनंदन केले.

COMMENTS