Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्नरजवळील अपघातात दोन महिलांचा मृत्यू

पुणे ः जुन्नरच्या ओतूर परिसरात भीषण अपघात झाला असून त्यात दोन्ही महिलेचा मृत्यू झाला आहे. नगर- कल्याण महामार्गावर ही घटना घडली असून भरधाव कंटेनरन

नाशिकमध्ये विचित्र अपघातात 6 जणांचा मृत्यू
पुण्यात भीषण अपघात ! 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू
बारामतीत बस अपघातात 27 विद्यार्थिनी जखमी

पुणे ः जुन्नरच्या ओतूर परिसरात भीषण अपघात झाला असून त्यात दोन्ही महिलेचा मृत्यू झाला आहे. नगर- कल्याण महामार्गावर ही घटना घडली असून भरधाव कंटेनरने दोन्ही महिलांना जोरदार धडक दिली. कोळमाथा परिसरातून दोन्ही महिला प्रवास करत होत्या. त्यावेळी मागच्या बाजूने आलेल्या वाहनानं दोघांनाही धडक दिली. त्यात दोन्ही महिलांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
 ऋतुजा अशोक डुंबरे आणि सविता गीताराम तांबे अशी मृत महिलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावरून ऋतुजा अशोक डुंबरे ही 19 वर्षीय तरुणी घराच्या दिशेने पायी चालत निघाली होती. याशिवाय सविता तांबे या पतीसोबत दुचाकीने प्रवास करत होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या एका भरधाव पिकअपने ऋतुजाला धडक दिली, त्यानंतर पिकअप सविता यांच्या दुचाकीला धडकली. विचित्र आणि तितक्याच या भीषण अपघातात दोन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतांची घरे अपघातस्थळापासून जवळच असल्याने ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS