Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कुस्ती स्पर्धेत सर्वोदय विद्यालातील दोघांना सुवर्ण

अकोले : पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यानगर जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या सर्वोदय विद्यालयातील दोन मल्लांनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सदगीर सार्थक वाळू (इयत्ता दहावी) याने ५७ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच कातळापूर येथील नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्यामंदिराचा विद्यार्थी दहिफळे रघुवीर चंद्रशेखर (इयत्ता दहावी) याने ३८ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. या दोन्ही कुस्तीपटूंनी मिळवलेल्या यशामुळे त्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशासाठी त्यांना कुस्ती साई केंद्राचे संचालक व आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक तानाजी नरके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयातील क्रीडा शिक्षक, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, मुख्याध्यापक संपत धुमाळ, जालींदर आरोटे, विनोद तारू यांचेही मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ऍड. मनोहरराव देशमुख, सचिव एम. एल. मुठे, माजी सचिव टी. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर, एस. टी. येलमामे, विजय पवार, श्रीराम पन्हाळे, अशोक मिस्त्री, प्रकाश महाले यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख, उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

ऍड.देशमुख महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात 
टाकळी शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान
आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

अकोले : पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यानगर जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या सर्वोदय विद्यालयातील दोन मल्लांनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सदगीर सार्थक वाळू (इयत्ता दहावी) याने ५७ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच कातळापूर येथील नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्यामंदिराचा विद्यार्थी दहिफळे रघुवीर चंद्रशेखर (इयत्ता दहावी) याने ३८ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले.

या दोन्ही कुस्तीपटूंनी मिळवलेल्या यशामुळे त्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशासाठी त्यांना कुस्ती साई केंद्राचे संचालक व आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक तानाजी नरके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयातील क्रीडा शिक्षक, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, मुख्याध्यापक संपत धुमाळ, जालींदर आरोटे, विनोद तारू यांचेही मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ऍड. मनोहरराव देशमुख, सचिव एम. एल. मुठे, माजी सचिव टी. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर, एस. टी. येलमामे, विजय पवार, श्रीराम पन्हाळे, अशोक मिस्त्री, प्रकाश महाले यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख, उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

COMMENTS