अहमदनगर/प्रतिनिधी - भरधाव वेगात वाहने चालवत रस्त्याने जाणार्या-येणार्यांच्या सुरक्षिततेला तसेच स्वत:च्या सुरक्षिततेलाही धोक्यात आणणारी कृती करण
अहमदनगर/प्रतिनिधी – भरधाव वेगात वाहने चालवत रस्त्याने जाणार्या-येणार्यांच्या सुरक्षिततेला तसेच स्वत:च्या सुरक्षिततेलाही धोक्यात आणणारी कृती करणार्या दोघांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नगर-मनमाड महामार्गावर नवनागापूर परिसरात असलेल्या गरवारे चौकात ही कारवाई केली.
प्रवीण अण्णासाहेब सिनारे (रा. निंभोरे, सोनगाव) हा युवक त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवत स्वतःची व इतर नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणताना आढळून आला. तसेच शाम धोंडू पाटील (वय 34, रा. दूध डेअरी चौक, वडगाव गुप्ता) हा त्याच्या ताब्यातील नवीन वाहन भरधाव वेगात चालवताना आढळून आला. त्यामुळे या दोघांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 279, 336 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS