शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

औरंगाबाद प्रतिनिधी/  औरंगाबादमध्ये दोन सख्ख्या किशोरवयीन भावांचा शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद तालुक्यातील करमाड ज

आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका
निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संपाची हाक
आईकडून पोटच्या मुलीलाच जाळण्याचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी/  औरंगाबादमध्ये दोन सख्ख्या किशोरवयीन भावांचा शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद तालुक्यातील करमाड जवळील दरकवाडी शिवारात ही घटना घडली. पार्थ धनंजय वाघ (वय 11) आणि अजिंक्य धनंजय वाघ (वय 9) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पार्थ आणि अजिंक्य यांच्या आई वडिलांना आक्रोश अनावर झाला होता.
दोघे भाऊ काल सायंकाळच्या सुमारास शेततळ्यावर गेले असता एक जण शेततळ्यात बुडायला लागल्यावर दुसऱ्या भावाने त्याला वाचवायला शेततळ्यात उडी मारली परंतु तो देखील पाण्यात बुडाला. यामुळे दोन्ही भावांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

COMMENTS