Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवर दोन जणांचा होरपळून मृत्यू ; अपघातानंतर कारने घेतला पेट

बुलडाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गुरूवारी सकाळी 9 वाजता भीषण अपघात झाला असून, अपघातानंतर वाहनाने पेट घेतला. या दुर्घटनेत दोन जणांचा होरप

*अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
ग्रामरणरागिनी पुरस्काराने वर्षाताई जवळ सन्मानित
आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण

बुलडाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गुरूवारी सकाळी 9 वाजता भीषण अपघात झाला असून, अपघातानंतर वाहनाने पेट घेतला. या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गावर कार क्रमांक एमएच 04 एलबी 3109 मुंबईवरून अकोल्याच्या दिशेने जात होती़ दरम्यान चॅनेल क्रमांक 318.8 वर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार मीडियनमधील क्रॅश बॅरिअरला धडकली आणि बॅरिअरची लोखंडी पट्टी कारच्या समोरून घुसून मागील बाजूने बाहेर पडली. यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात गणेश सुभाष टेकाळे (वय 40) आणि राजू महंतलाल जयस्वाल (वय 32), दोघेही रा़ मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला. कारचा चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय 35, रा़ मुंबई) गंभीर जखमी असून, त्याला तातडीने बीबी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS