Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ट्रॅपचे आणखी दोन प्रकार उघड; दोन व्यापार्‍यांना 36 लाखाला लुटले

कोल्हापूर / नागाव : शहर परिसरातील आणखी दोन व्यापारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. एका व्यापार्‍याकडून 35 ल

सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक
सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी
मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. आर. जोशी

कोल्हापूर / नागाव : शहर परिसरातील आणखी दोन व्यापारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. एका व्यापार्‍याकडून 35 लाख, तर दुसर्‍याकडून एक लाख उकळल्याचे उघड झाले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून हा प्रकार केल्याची नोंद शाहूपुरी व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सहा संशयितांना अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका व्यापार्‍याची फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली. तिने चॅटींग करत त्यांना व्यवसायाच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, असा बहाणा करून तावडे हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना सादळे-मादळे परिसरात नेले. तिने स्वतःची ओळख लपवत व्यवसायासंबंधी चर्चा केली नाही. स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये खोली घेण्यास भाग पाडले. खोलीत असताना दरवाजा ठोठावून तिचे पाच ते सहा साथीदार आत घुसले. त्यांनी ती आपली बहीण असल्याचे सांगून, तिच्याशी गैरप्रकार केलास, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना मोटारीतून कुशिरे घाटात नेऊन मारहाण केली. अब्रू वाचविण्यासाठी 50 लाखांची मागणी केली. यामध्ये 10 लाख रुपयांवर तडजोड झाली. त्यातील एक लाख रुपये दोन नोव्हेंबरला घेतले. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी वारंवार दूरध्वनी करून धमकी देण्यात आली, अशी फिर्याद पीडित व्यापार्‍याने दिली. त्यानुसार एका महिलेसह पाच ते सहा संशयितांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सोनाली ऊर्फ प्रतीक्षा पाटील या संशयित महिलेला अटक केल्याचे प्रमोद जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, अन्य एका हनी ट्रॅप प्रकरणात शहरातील एका उद्योजकाची लाखोंची फसवणूक करण्यात आली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. विजय यशवंत मोरे (वय 36, रा. व्हन्नूर, ता. कागल), सागर पांडुरंग माने, रोहित कोंडिराम साळोखे (37, रा. शिवाजी पेठ), फारुख बाबासाहेब खान (32, रा. महाराणा प्रताप चौक परिसर), प्रमोद ऊर्फ गणेश पुंडलिक शेवाळे (30, रा. कळंबा जेल परिसर) व विजय ऊर्फ पिंटू शंकर कलकुटगी (39, राजारामपुरी 10 वी गल्ली) अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS