Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन मंत्र्यांचा सहभाग

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

पुणे .. पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणावरून आरोपांची राळ उठवली जात असून, याप्रकरणी आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यात मंत्रीदादा भुसे

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची रिटेल विस्‍तारीकरणासह अग्रणी वाटचाल
“आता लॉकडाउन लावावाच लागेल” | Maharashtra Lockdown |
राहुल गांधी मागासलेल्या समाजाचा अपमान करतात परंतु माफी मागण्यास तयार नाही – अनुराग ठाकुर 

पुणे .. पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणावरून आरोपांची राळ उठवली जात असून, याप्रकरणी आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यात मंत्रीदादा भुसे यांनी मदत केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता त्यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच या दोन मंत्र्यांची नावे लवकरच पुढे आणू असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात बोलतांना अंधारे म्हणाल्या की, मंत्री दादा भुसे यांचे फोन डिटेल्स तपासल्यावर सर्व सत्य बाहेर येईल. मंत्रीपदावर असताना कुठल्याही प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी मंत्रीपदावरुन पायउतार झाले पाहिजे, त्यानंतरच त्यांची चौकशी केली जाऊ शकते. ससूनमध्ये ललित पाटील याच्यावर काय उपचार सुरू होते, याची माहिती सरकारने द्यावी. गृहमंत्री आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली खुली करायची असते हे आम्हाला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आला हे सांगू नका. पण उपचार काय सुरू होते हे तरी सांगा, असे आव्हानच अंधारे यांनी दिले. तसेच ससून रुग्णालयातील अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना पदावर राहण्याचा आधिकार नाही. संजीव ठाकूर यांचं निलंबन करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा अन्यथा या सगळ्या प्रकरणी महविकास आघाडी 24 तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे.

COMMENTS