Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंधच्या मैदानात दोन महाराष्ट्र केसरी भिडणार; कोण मारणार मैदान

पृथ्वीराज पाटील की हर्षवर्धन सदगीर…. शौकिनांमध्ये उत्सुकताऔंध / वार्ताहर : औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवी यात्रेनिमित्त आज शुक्रवार, दि. 16

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
सातारा जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविणार : पालकमंत्री
भविष्यात सत्ताबदलात महाडिक कुटूंबाचा मोलाचा वाटा : देवेंद्र फडणवीस

पृथ्वीराज पाटील की हर्षवर्धन सदगीर…. शौकिनांमध्ये उत्सुकता
औंध / वार्ताहर : औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवी यात्रेनिमित्त आज शुक्रवार, दि. 16 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यावेळी प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत होणार आहे.
श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्‍वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री यमाई देवी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ औंध यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मूळपीठ देवीच्या पायथ्याशी असलेल्या भव्य आखाड्यात शुक्रवारी दुपारी चारपासून नेत्रदीपक लढतीचा थरार रंगणार आहे. सुबोध पाटील शिवराम दादा तालिम पुणे विरुध्द वैभव माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे यांच्यात सामना रंगणार आहे.
राघू ठोंबरे कोल्हापूर विरुध्द श्रीमंत भोसले इचलकरंजी, धिरज पवार कुंडल विरुध्द सागर तामखडे बेलापूर परस्परांशी भिडणार आहेत. मैदानात लहान गटातील चटकदार कुस्त्या देखील होणार आहेत. लहान गटातील कुस्त्या शुक्रवारी सकाळी राजवाड्या शेजारील श्री यमाई देवी मंदिरात दुपारी बारा वाजेपर्यंत जोडल्या जाणार आहेत. इच्छुक मल्लांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS