गाडीच्या पार्किंगवरून घातला वाद व पळवले पावणे दोन लाख…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडीच्या पार्किंगवरून घातला वाद व पळवले पावणे दोन लाख…

केडगावच्या भूषणनगरमधील घटना, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : गाडी रस्त्याच्या कडेला लावून जिलेबी आणण्यासाठी गेलेल्या गाडी चालकास गाडी राँग साईडला का लावली असे म्हणून शिवीगाळ करीत दमदाटी केली

नगर जिल्हा अध्यात्माची भूमी – पालकमंत्री विखे
स्मशानभूमीतील ती लोखंडी जाळीही चोरट्यांनी चोरली
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर/प्रतिनिधी : गाडी रस्त्याच्या कडेला लावून जिलेबी आणण्यासाठी गेलेल्या गाडी चालकास गाडी राँग साईडला का लावली असे म्हणून शिवीगाळ करीत दमदाटी केली व यादरम्यान गाडीतील एक लाख 72 हजार 800 रुपये चोरुन नेल्याची घटना केडगाव येथील लिंक रोडवरील भूषणनगर येथील झेंडा चौकात घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की विलास हरिश्‍चंद्र झांबरे (वय 58 वर्षे, रा. रासनेनगर, सावेडी, अ.नगर) यांचा इंडियन ऑईल स्माईल स्टोन फ्युअल स्टेशन नावाचा पेट्रोल पंप कामरगाव शिवारात नगर-पुणे हायवे रोडलगत आहे. रासनेनगर ते कामरगाव येथील पेट्रोल पंपपर्यंत झांबरे हे चारचाकी डस्टर गाड़ीने (नं. एमएच 16 एटी 7067) येऊन-जाऊन करतात. रोज रात्री घरी जाताना पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड ते घरी घेऊन जातात. 29 रोजी पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली 1 लाख 72 हजार 800 रुपयाची रोकड घेऊन कामरगाव येथून रात्री आठ वाजता ते निघाले. केडगाव येथील रंगोली हॉटेल जवळून लिंक रोडने जात असताना झेंडा चौकात एका ठिकाणी जिलेबी घेण्याकरीता रस्त्याच्या उजव्या साईडला गाडी लावून जिलेबी पार्सल घेत असताना तितक्यात तिथे एका फोर व्हिलरमधून दोघेजण जवळ आले व तू गाड़ी राँग साईडला का लावली असे म्हणून दमदाटी केली. तेव्हा झांबरे त्यांना समजावून सांगत होते. त्यानंतर त्या दोघांनी खाली या म्हणून दमदाटी केली. झांबरे हे गाडीखाली उतरले तेंव्हा त्या दोघांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर झांबरे यांना बाजूला घेवुन दमदाटी केली. त्यावेळी झांबरे यांनी त्यांच्या गाडीचा नंबर पाहिला तेंव्हा ती गाडी टाटा कंपनीची होती व नंबर एमएच 16 सीक्यू 3200 असा होता. त्यानंतर ते लोक निघून गेले. झांबरे यांनी गाडीत बसून कॅश चेक केली असता गाडीच्या डॅशबोर्ड डिक्कीत कॅश नव्हती. गाडीच्या काचा उघड्या असल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या गाडीतील कॅश नजर चुकवून चोरून नेली असावी व हे चोरटे त्यांच्याशी हुज्जत घालणारे व गाडीमधून आलेल्या लोकांशी संबंधित असावे, असा त्यांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणी कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक अंकुश कासार करीत आहेत.

COMMENTS