श्रीगोंदा : नगर दौंड महामार्गावर बुधवार ८ जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले तरजण किरकोळ जखमी झाले आह

श्रीगोंदा : नगर दौंड महामार्गावर बुधवार ८ जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले तरजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत समजलेल्या माहिती नुसार श्रीगोंद्यातील जेष्ठ पत्रकार सुरेश पिपाडा हे त्यांच्या सुनेला डिलिव्हरी साठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते मात्र तेथील डॉक्टरांनी पेशंट नगरला घेऊन जाण्यास सांगितले त्यावरुन पेशंट श्रीगोंदयावरुन 102 ने नगरकडे घेऊन जात असताना पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास कोळगाव जवळ कोथुळ चौफुल्यावर कोथळकडुन ऊसाच्या दोन ट्रॉलीचा ट्रॅक्टर अचानक पुढे आल्याने ॲम्ब्युलन्स व ट्रॅक्टर या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला.
या अपघातात रंजना पिपाडा यांचा मृत्यू झाला असून, सुरेश पिपाडा, ड्रायव्हर, सिस्टर गंभीर जखमी झाले असुन सुन व मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दाखल नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असुन हॉस्पिटलमध्ये सुनेने बाळाला जन्म दिला असून आई व बाळ सुखरूप आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याच महामार्गावर सुनिल शाहु छतिसे व त्यांच्या पत्नी यांच्या मोटारसायकलला समोरुन येणाऱ्या कारणे उडवले.यात त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नगर दौंड महामार्गावर सततच्या होत असलेल्या अपघातामुळे वहातुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
COMMENTS