Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई ः खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका आयशर टेम्पोनं कारला मागील बाजूनं धडक दिली. अपघातात ट्रकच्य

समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात
गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

मुंबई ः खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका आयशर टेम्पोनं कारला मागील बाजूनं धडक दिली. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. यात टेम्पोचा चालक अनिल लाखन गावीत (वय 27 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. तर, ड्रायव्हर सोबत केबीनमध्ये बसलेला अनिकेत बोरसा हा गंभीर जखमी झाला. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. हे दोघेही दादर नगर हवेलीतील सिल्वासा येथील राहणारा होते.  
ज्या कारला पाठीमागून धडक बसली, त्या कारचा चालक घाबरून घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच आयआरबीचं गस्ती पथक, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोहोचली. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ठाणे शहरातील वर्दळीच्या घोडबंदर रोडवर कंटेनरला भीषण आग लागून एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळं घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर हटवल्यानंतर तब्बल 3 तासांनी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

COMMENTS