Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये दोन जवान गेले वाहून

6 हजार अमरनाथ यात्रेकरू रामबनमध्ये अडकले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडी राज्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्याचवेळी हिमाचलच्या लाहुल आणि स्पीतीमध्ये पूर

मराठी पञकार परीषदेच्या बीड येथील विभागीय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – अनिल महाजन
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर
शिक्रापुरात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडी राज्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्याचवेळी हिमाचलच्या लाहुल आणि स्पीतीमध्ये पूर आणि हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पोशाना नदी पार करताना लष्कराचे दोन जवान वाहून गेले.
दिल्लीत झालेल्या पावसाने गेल्या 41 वर्षांचा विक्रम मोडला आहे. रिज परिसरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 128 मिमी पाऊस झाला. तर, केवळ सफदरजंग परिसरात 126.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी जुलै 2003 मध्ये 24 तासांत 133.4 मिमी पाऊस झाला होता. दुसरीकडे, 21 जुलै 2013 रोजी दिल्लीत 123.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येथे, श्रीनगर आणि जम्मू दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 44 वर, पंथ्याल बोगद्याच्या तोंडावर रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. श्रीनगर खोर्‍याला देशाशी जोडणारे तीन मार्ग छक-44, मुघल रोड आणि लेह-लडाख रोडवर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. सध्या फक्त सिंथन रोड खुला आहे. एनएच बंद झाल्यामुळे उधमपूरमध्ये शेकडो वाहने अडकून पडली आहेत. त्याचवेळी दक्षिण काश्मीरमध्ये खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे 6 हजार अमरनाथ यात्रेकरू रामबनमध्ये अडकले आहेत

COMMENTS