Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे दोन गट भिडले ; 71 जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड प्रतिनिधी - बीडच्या केज येथे दोन गट आपापसात भिडले आणि यामुळे दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. दरम्यान या घटनेनंतर केज शहरात तणावाचे वातावरण

…तर, पंधरा कोटींचा महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल !
आई जगाचा पोशिंदा तर शेतकरी बाप व दिशा देणारा शिक्षक ः सुनील कडलग
जिल्हा परिषदचे १४ कनिष्ठ सहाय्यक यांना वरिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नतीने पदस्थापना

बीड प्रतिनिधी – बीडच्या केज येथे दोन गट आपापसात भिडले आणि यामुळे दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. दरम्यान या घटनेनंतर केज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सदरील घटना समजताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी 71 जणांविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सध्या चौका-चौकांमध्ये बंदोबस्त, पोलीस अधीक्षकांसह 15 अधिकारी आणि विशेष पथके तळ ठोकून आहेत. ट्रॅक्टर वर वाजवलेल्या मोठ्या आवाजातील गाण्यावरून हा वाद झाला होता. या घटनेच्या अनुषंगाने चुकीचे व्हिडिओ, फोटो मेसेज मजकूर तयार करून वायरल करून अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांची नजर आहे. असे केल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

COMMENTS