Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू

महाड :  महाडमध्ये भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचार्‍यांना जोरदार धडक दिली आहे. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभ

सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू नसून घातपातच
विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

महाड :  महाडमध्ये भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचार्‍यांना जोरदार धडक दिली आहे. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अज्ञात वाहनाला टेम्पोची धडक बसली. यात टेम्पोच्या कॅबिनचा चुराडा झाला आहे. कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकदेखील जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती हे महाड एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. सोमवारी रात्रपाळीसाठी चौघेही कामावर निघाले होते. रस्त्यावरून पायी जात असताना काळीजकोंड परिसरात एका भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली शत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS