Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ग्रामदेवतेच्या यात्रा मिरवणुकीत रथाचे चाक अंगावर पडल्याने दोन भाविकांचा जागीच मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी - अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेत रथोत्सव प्रसंगी रथाचे चाक अंगावर तुटून पडल्याने इरप्पा नंदे

हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत
पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!
मुंबईमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या

सोलापूर प्रतिनिधी – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेत रथोत्सव प्रसंगी रथाचे चाक अंगावर तुटून पडल्याने इरप्पा नंदे आणि गंगाराम मंजुळकर हे दोन भाविक जागेवर मृत्युमुखी पडले. ही दुर्दैवी घटना 26 मार्च रोजी घडली आहे. या बाबत रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. इरप्पा गिरमल नंदे (वय ४५), गंगाराम तिपण्णा मंजुळकर (वय ६०) असे ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. वागदरी चे ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा अक्कलकोट तालुक्यात लक्षवेधी असते. सालाबादप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन दिवसांपसून सुरू होती. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. रथोत्सव जाताना मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने गेली. परतीच्या वेळी अचानकपणे पार तुटला. तेव्हा रथ तीन चाकांवर जागेवरच थांबला. यात्रेत मोठी गर्दी होती. त्या गर्दीत इरप्पा नंदे व गंगाराम मंजुळकर हे दोघेही निखळलेल्या चाकाखाली सापडले. हजारोंची गर्दी असल्याने प्रचंड गोंधळ उडाला.तेव्हा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी गर्दी हटविली व त्या दोघांना तत्काळ उपचारांसाठी पाठविले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघे मरण पावल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे यात्रा जागेवर थांबवली. शिवाय रात्रीचे कन्नड नाटक रद्द केले. होणाऱ्या कुस्त्याही रद्द करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे. सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या यात्रेत भुरीकवटे, गोगाव, खैराट, आलूर, अचलेर, मुरुम, केसरजवळगे, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, किरनळळी, पलापूर, किणी, किणीवाडी, कर्नाटकातील हिरोळी, आळंद, अक्कलकोट, आदी ठिकाणांहून देखील यात्रेसाठी हजारोंची गर्दी झाली होती.

COMMENTS