Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

नागपूर : समृद्धी महामार्गावर मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.  येथील वाहतूक ही दोन्ही दिवस चार तासांसाठी बंद राहणार

समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे आज लोकार्पण
समृद्धी महामार्ग राहणार पाच दिवस बंद
समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करा

नागपूर : समृद्धी महामार्गावर मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.  येथील वाहतूक ही दोन्ही दिवस चार तासांसाठी बंद राहणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असल्याने दुपारी 12 ते 4 दरम्यान हा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
या काळात हा मार्ग जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. राज्यातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळख असणार्‍या समृद्धी महामार्गावर विविध कामे सुरू आहेत. आज आणि उद्या या मार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारण्यात येणार आहे. हे काम कसारण्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुंची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 दरम्यान हे काम पूर्ण केले जाणार असून यानंतर या मार्गावरील वाहतूक ही पूर्ववत केली जाणार आहे, असल्याची माहिती माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली.

COMMENTS