Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगेश्वरी संस्थेत दोन दिवसीय विज्ञान प्रयोग खेळणी कार्यशाळा संपन्न

विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक डॉ. जयंत जोशी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद

अंबाजोगाई प्रतिनिधी - दिनांक 30 जून व 01 जुलै 2023 रोजी श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित पू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या नवीन सभागृह

श्रीगोंदा तहसीलसमोर आज जाहीर निषेध सभा
उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुख पदच धोक्यात
मंत्रिमंडळात मित्रपक्षांना स्थान द्या : मंत्री आठवले

अंबाजोगाई प्रतिनिधी – दिनांक 30 जून व 01 जुलै 2023 रोजी श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित पू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या नवीन सभागृहात विज्ञान खेळणी कार्यशाळा य घेण्यात आली. या कार्यशाळेत योगेश्वरी नूतन विद्यालय व गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयातील निवडक वर्गांच्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ डॉ. जयंत जोशी यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची व प्रयोग करण्याची संधी मिळाली.  पूज्य बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी (इ-ठउ) भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. जयंत जोशी यांना बोलावण्यात आले होते.  दिनांक 30 जून 2023 शुक्रवार रोजी 11 वाजता श्री योगेश्वरी नूतन विद्यालय परळी रोड अंबाजोगाई येथे शाळेतील प्रार्थना मैदानावर सर्व विद्यार्थ्यांसमोर या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ए आर पाठक यांनी केले. प्रतिमापूजन व स्वागतानंतर श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी पाण्याचा दिवा पेटवून विज्ञान प्रयोगाने या कार्यशाळेचे उद्घाटन केले. तसेच डॉ. जयंत जोशी यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून प्रयोग करण्याची प्रेरणा दिली. विज्ञान शिकणे म्हणजे फक्त पुस्तकातून विज्ञानाचे पाठांतर करणे नव्हे तर आजूबाजूच्या निरीक्षणातून आणि विविध प्रयोगातून प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान शिकायला हवे असा संदेश दिला. या उद्घाटन कार्यक्रमाला श्री योगेश्वरी शिक्षण संस्था व श्री योगेश्वरी नूतन विद्यालयातील सर्व पदाधिकारी आणि शिक्षक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत धानोरकर यांनी केले. श्री गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मीना कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्घाटनानंतर सकाळी 11.30 ते 1.30 आणि दुपारी 2.30 ते 4.30 अशा दोन सत्रात इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पूज्य बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये विज्ञान प्रयोग खेळणीची ही कार्यशाळा पार पडली. योगेश्वरी नूतन विद्यालयाचे 400 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध नियमांवर आधारित सोप्या खेळणी प्रत्यक्ष बनवून अवघड विज्ञान सहज समजावून घेतले. दि. 01 जुलै 2023 शनिवार रोजी श्री गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या इयत्ता 7 वी व 8 वी च्या विद्यार्थिनींसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी 10.30 ते 12.30 व 1.30 ते 3.30 या दोन सत्रांत एकूण 300 विद्यार्थीनी व 20 शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.  या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग व खेळण्याचे विविध प्रकारचे साहित्य देऊन प्रत्यक्ष प्रयोग करायला शिकवण्यात आले. अँटीग्रेविटी कोन, ऊउ मोटार, फ्लोटींग पेन्सील, मल्टीपल इमेज, इलेक्ट्रीक मॅग्नेट, रिफ्लेक्शन अँगल, मॅजीक डाइवर, दृष्टीसातत्य, कॅलीडोस्कोप, पेरिस्कोप इत्यादी महत्वपूर्ण आणि मनोरंजक प्रयोगांतून विज्ञानाचे विविध नियम समजावून घेताना विद्यार्थ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहर्यावर व प्रतिसादातून जाणवत होता. कार्यक्रमानंतर शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीया खूप सकारात्मक व आनंददायी होत्या. श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक सदस्य श्री भीमाशंकर शेटे यांच्या विशेष प्रयत्नांतून व मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार यशस्वीपणे पार पडला. तसेच या कार्यशाळेत सहभागी झालेल्या दोन्ही शाळांच्या सर्व शिक्षिका व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विज्ञान प्रयोग करताना मोलाचे सहकार्य केले. पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा आणि विज्ञानविषयक विविध कार्यक्रम यांचे वारंवार आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती विज्ञान केंद्राचे समन्वयक हेमंत धानोरकर यांनी सांगितली.

COMMENTS