Homeताज्या बातम्यादेश

लष्करी जवानाच्या गोळीबारात दोन नागरिक ठार

राजोरी/वृत्तसंस्था ः जम्मू काश्मीरच्या राजोरी येथे लष्कराच्या एका जवानाने केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एक नागरिक जखमी

वारंवार भीक मागून त्या हॉटेल मालकाचे बिल भागवणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा ः भातखळकर
बरं झालं, संजय राऊत यांच्या अंगात आलं, अन आघाडीचं सरकार आलं ! ; विश्वजित कदम | LOKNews24

राजोरी/वृत्तसंस्था ः जम्मू काश्मीरच्या राजोरी येथे लष्कराच्या एका जवानाने केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एक नागरिक जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्ती हे लष्करासोबत हमालीचे काम करत होते, असे लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले. लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 6.15 वाजता राजोरी येथे एका लष्करी शिबिरात घडली. मृत नागरिक हे या शिबिराच्या अल्फा प्रवेशद्वाराजवळ येत होते. यावेळी प्रवेश द्वाराजवळ असलेल्या एका जवानाने त्यांच्यावर गोळीबार केला. यात येथील रहिवाशी शालिंदर कुमार आणि कमल किशोर यांचा मृत्यू झाला. जवानाने गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर येथील वातावरण हे तणावपूर्ण झाले आहे. यानंतर मोठ्या जमावाने लष्कराच्या केंद्रासमोर येत त्यांच्यावर दगडफेक केली. जमावाला नियंत्रीत करण्यासाठी तातडीने एका पथकाला त्या ठिकाणी पाठवण्यात आले. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. गोळीबार करणार्‍या जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची देखील चौकशी केली जात आहे.

COMMENTS