Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यधुंद मुख्याधिकार्‍यांनी उडवले दोन गाड्यांना

वाहनांचे मोठे नुकसान, तळेगाव दाभाडे येथील घटना

पुणे ः पुणे शहर आणि जिल्ह्यातील हिट अ‍ॅन्ड रनच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. विशाल अग्रवाल या उद्योगपतीच्या मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना

समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
तिरुवन्नामलाईमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू
समृद्धीवर मध्यरात्री मृत्युचे तांडव

पुणे ः पुणे शहर आणि जिल्ह्यातील हिट अ‍ॅन्ड रनच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. विशाल अग्रवाल या उद्योगपतीच्या मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना उडवले होते, यात त्या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरूर तालुक्यात पिकअप व्हॅन चालवणार्‍या एका अल्पवयीन तरुणीने दुचाकीवरील 2 तरुणांना उडवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता रविवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना हिट अँन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वेगाने स्कार्पीओ चालवून त्यांच्या गाडीने रस्त्यावरील दोन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ते पळून गेले होते. ही घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली.

दरम्यान मुख्याधिकारी एन. के.पाटील असे या मुख्याधिकार्‍यांचे नाव आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. एन.के.पाटील कार चालवत घरी जात असताना तळेगाव स्टेशन दरम्यान त्यांनी दोन कारला पाठीमागून ठोकर दिली. सुदैवाने या कारमध्ये कोणी नसल्याने कोणाला काहीच इजा झाली नाही, मात्र यावेळी मुख्याधिकारी अपघात करून पळून गेले. हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्यात नुकत्याच घडलेल्या पोर्श अपघातानंतर तळेगावातील एका मोठ्या सरकारी अधिका-याकडून झालेल्या या हिट अँन्ड रन अपघाताची मोठी चर्चा तळेगाव दाभाडे परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट मुख्याधिकार्‍यांच्या घरी पोहचले. मात्र कारवाईच्या भीतीने त्यांनी काही वेळ दार उघडले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नंतर त्यांनी दार उघडले. तर पोलिसांनी मुख्याधिकार्‍यांकडून जप्त केलेली लाल रंगाची स्कार्पिओ गाडी सोलापूर येथील एका महिलेच्या नावावर आहे, त्यावर महाराष्ट्र शासन अशी पाटी आहे.

COMMENTS