Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू

मुंबई : वडाळा येथील महापालिकेच्या उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू झाला. पोटच्या मुलांच्या अशा अचानक झालेल्य

सन मराठी’ ची ‘सावली होईन सुखाची’ नवी मालिका ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला
नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
भाजपकडून सुडाचं राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे | DAINIK LOKMNTHAN

मुंबई : वडाळा येथील महापालिकेच्या उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू झाला. पोटच्या मुलांच्या अशा अचानक झालेल्या मृत्युने जोडप्यावर आधीच दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना महापालिकेने दुसर्‍याच दिवशी त्यांच्या डोक्यावरील छतही काढून घेतले याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
 तसेच, या जोडप्याच्या बेकायदा झोपडीवरील ही कारवाई नियोजित होती का आणि ती कायद्यानुसार केली गेली का ? अशी विचारणा करून न्यायालयाने महापालिकेकडे त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. अनुक्रमे चार आणि पाच वर्षांच्या दोन्ही मुलांचा करूण अंत झाल्याने मनोज वाघारे आणि त्यांची पत्नी मानसिक आघातात होते. त्यानंतर, दुसर्‍याच दिवशी महापालिकेने त्यांच्या बेकायदा झोपडी पाडून कहर केल्याचे कारवाईतून प्रतीत होते, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने महापालिकेकडून उपरोक्त स्पष्टीकरण मागताना केली. कारवाईबाबतचा पूर्ण तपशील सादर करण्याचेही न्यायालयाने महापालिकेला बजावले.

COMMENTS