गावठी कट्टा व जिवंत काडतूस कब्जात बाळगणारे सराईत दोन आरोपी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावठी कट्टा व जिवंत काडतूस कब्जात बाळगणारे सराईत दोन आरोपी जेरबंद

अहमदनगर : विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस कब्जात बाळगणारे सराईत दोन आरोपी जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाची कारवा

अ‍ॅड. शिंदे आणि डॉ. मंचरकर यांचा वैचारिक वारसा जपला पाहिजे
मनपात आता 67 विरुद्ध0 …विरोधक कोणी देता का?
साईबाबांच्या चरणी 28 लाखांचा मुकुट दान

अहमदनगर : विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस कब्जात बाळगणारे सराईत दोन आरोपी जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाची कारवाई श्री . बी . जी . शेखर पाटील साहेब , विशेष पोलीस उपमहानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र ,  पोलीस अधीक्षक . मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा – या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते . वरील सुचना प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा – या गुन्हेगारांची माहिती घेत असतांना दिनांक ०३/१२/२०२१ रोजी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , एक इसम अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर , विजय हॉटेलचे समोर , प्रवरा संगम , ता . नेवासा येथे बेकायदेशिररित्या गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्याचे करण्याचे उद्देशाने फिरत आहे . आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर , पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे , पोलीस नाईक शंकर चौधरी , पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के , पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास नवगिरे , पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरदंले , पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे , चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड  अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी प्रवरा संगम , ता . नेवासा येथे जावून सापळा लावून बातमी मधील वर्णनाचे इसमाचा शोध घेत असता विजय हॉटेल समोर बातमी मधील वर्णनाचा इसम व त्याचा साथीदार उभे राहून आजूबाजूस संशयीत नजरेने टेहळणी करीत असल्याचे दिसले . पोलीस पथकाची खात्री झाल्याने सर्वांनी त्यांना घेराव घालून ११.०० वा.चे सुमारास ताब्यात घेतले . त्यांना पोलीसांनी पंच व पोलीस स्टाफची ओळख सांगून त्याचे नाव , पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव १ ) महेश काशिनाथ काळे , वय २५ , रा . जामगांव , ता . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद व २ ) आण्णासाहेब शिवाजी कोल्हे , वय २१ , रा . मुलानी वडगांव , ता . पैठण , जिल्हा औरंगाबाद असे असल्याचे सांगीतले . त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करुन , अंगझडती घेतली असता , त्यांचे अंगझडतीमध्ये आरोपी क्रमांक १ यांचे ताब्यातुन एक स्टीलचा गावठी कट्टा , तीन जिंवत काडतुस व एक मोबाईल फोन व आरोपी क्रमांक २ यांचे ताब्यातुन एक स्टीलचा गावठी कट्टा , तीन जिंवत काडतुस व एक मोबाईल फोन असा एकूण ९९ , २०० / -रु . किं . चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे . वरील नमुद दोन्ही आरोपी नामे १ ) महेश काशिनाथ काळे वय २५ , रा . जामगांव , ता . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद व २ ) आण्णासाहेब शिवाजी कोल्हे वय २१ , रा . मुलानी वडगांव , ता . पैठण , जिल्हा औरंगाबाद या दोघांकडे प्रत्येकी एक असे एकूण दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर घटने बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक  ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी नेवासा पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९ २६ / २०२१ आर्म अॅक्ट क ३/२५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही नेवासा पो.स्टे . करीत आहेत . सराईत आरोपी नामे महेश काशिनाथ काळे , वय २५ , रा . जामगांव , ता . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद यांचे विरुध्द खालील प्रमाणे दरोडा , खुनाचा प्रयत्न , चोरी , मारहाण व अवैध शस्त्र बाळगणे व विक्री करणे असे एकुण ८ गंभीरगुन्हे दाखल आहेत . १ ) एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. २६४/२०१७ भादविक ३०७ , ४२४ , १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , २ ) गंगापुर , जिल्हा औरंगाबाद पो.स्टे.गु.र.नं. २६१/२०१६ भाविक ३०७ , ४३६ , १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ३ ) विरगांव पो.स्टे . जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. ३३/२०१७ भादविक ३ ९ ५ ४ ) बांळुज पो.स्टे . , जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. २३४/२०१८ गौण खनिज कायदा क . २४ ( १ ) ५ ) विरगांव पो.स्टे . जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. १८३/२०१८ मोटार वाहन ६ ) गंगापुर पो.स्टे . जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. २५२ / २०२० आर्म अक्ट ३/२५ कायदा क . १३० ( १ ) ( ३ ) १७७ 1 ॥२ ॥ ७ ) गंगापुर पो.स्टे . जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. १५३/२०२१ भादविक ३२४ , ३२३,५०४ , ५०६ ८ ) गंगापुर पो.स्टे . जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. २४४/२०२१ आर्म अक्ट ३/२५ आरोपी नामे आण्णासाहेब शिवाजी कोल्हे , वय २१ , रा . मुलानी वडगांव , ता . पैठण , जिल्हा औरंगाबाद यांचे विरुध्द मारहाण करुन दुखापत करणे असा एक गुन्हा दाखल आहे . १. पैठण पो.स्टे . जिल्हा औरंगाबाद गु.र.नं. ३६५/२०२१ भादविक ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ सदरची कारवाई श्री . बी . जी . शेखर पाटील . विशेष पोलीस उपमहानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक  दिपाली काळे ,उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे  यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

COMMENTS