इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हातात घेतल्यापासून ट्विटर कंपनी सातत्याने चर्चेत आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात नारळ देणं असो, अनेक कर्
इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हातात घेतल्यापासून ट्विटर कंपनी सातत्याने चर्चेत आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात नारळ देणं असो, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपात करून त्यांना परत बोलावणं असो किंवा ब्लू टिक बाबतचे अनेक निर्णय यामुळे ट्विटर आणि इलॉन मस्क सतत चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा ट्विटर चर्चेत आलं आहे. कारण इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल केला आहे. ट्विटरची ओळख असलेला निळा पक्षी (Blue Bird) आता गायब झाला आहे. नव्या बदलानंतर अनेक जण चकित झाले आहेत. ट्विटरने ‘डॉज’ हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागले. ट्विटर हॅक झालं की काय असंही अनेकांना वाटलं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केलं आहे.
COMMENTS