Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाराशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘विक्रम’ लँडरचे चित्र रेखाटून शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

कोपरगांव/प्रतिनिधी : आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांच्या कष्टातून व त्यागातून चंद्रावर पाठविलेले ‘विक्रम’ लँडर चंद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष

अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण
भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यलय येथे निदर्शने l पहा LokNews24
विडी कामगारांना मिळाली घर बांधण्यासाठी हक्काची जागा

कोपरगांव/प्रतिनिधी : आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांच्या कष्टातून व त्यागातून चंद्रावर पाठविलेले ‘विक्रम’ लँडर चंद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले. त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला. देशात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येवून देशाच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यात आले. हा आनंद कोपरगाव तालुक्यातील गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील साजरा केला. एकाच वेळी 1200 विद्यार्थ्यांनी ‘विक्रम’ लँडर चंद्रयानाचे चित्र रेखाटून देशाच्या शास्त्रज्ञांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले आहे.

शास्त्रज्ञांनी 14 जुलै रोजी चंद्रावर पाठविलेले ‘विक्रम’ लँडर चंद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले.गौरवशाली भारताच्या इतिहासात अंतराळ संशोधनात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी.अशी ऐतिहासीक कामगिरी आपल्या देशातील अंतराळ संशोधन करणार्‍या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी करून दाखवली. त्यामुळे देशाच्या 140 कोटी जनतेचा ऊर अभिमानाने भरून आला होता.या मोहिमेच्या यशामुळे संपूर्ण विश्‍वाला आपल्या देशाच्या अंतराळातील संशोधनाच्या बुद्धिमत्तेची जाणीव झाली असून, जगभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.संपूर्ण विश्‍वाला जरी आपल्या देशाचा हेवा वाटत असून या देशाचे नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाला इस्रोच्या शास्त्रज्ञांचे सार्थ अभिमान वाटत आहे. प्रत्येक भारतीयाने विविध माध्यमातून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या संकल्पनेतून गौतम पब्लिक स्कूलच्या 1200 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘विक्रम’ लँडर चंद्रयानाचे या सर्व विद्यार्थ्यांनी चंद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यापासून ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचे चित्रे रेखाटून या वैज्ञानिकांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. येणार्‍या काळात गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी देखील इस्रो,नासासारख्या अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये आपलं नाव झळकवतील व भारताचे नाव उज्वल करतील अशी आशा प्राचार्य नूर शेख यांनी व्यक्त केली.या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व बालकलाकारांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकरावजी काळे, ट्रस्टी आ.आशुतोष काळे, सचिव चैताली काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, प्राचार्य नूर शेख व सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS