पुणे/प्रतिनिधी ः एका व्यवसायिकाने बोगस कंपन्याच्या माध्यमातून सुमारे 70 कोटी 22 लाखांची खरेदीची बनावट बिले तयार करुन शासनाच्या वस्तू व सेवा कर (ज

पुणे/प्रतिनिधी ः एका व्यवसायिकाने बोगस कंपन्याच्या माध्यमातून सुमारे 70 कोटी 22 लाखांची खरेदीची बनावट बिले तयार करुन शासनाच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचा 12 कोटी 59 लाख रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर याप्रकरणी पुणे जीएसटी विभागाने कडक कारवाई करत, सदर व्यवसायिकाला उत्तर प्रदेशातून अटक केल्याची माहिती सोमवारी दिली आहे.
सिराजउद्दीन कमालुद्दीन चौधरी (रा.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. आरोपी चौधरी याने बोगस कंपन्याच्या नावाने बनावट बीले जीएसटी विभागाकडे सादर केली होती. परंतु जीएसटीच्या तपासात व्यवसायिकाने बनावट बिले सादर करुन शासनाचा 12 कोटी 59 लाख रुपयांचा महसुल कर बुडविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जीएसटी कडून याबाबत पोलिसांकडे रितसर लेखी तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर आरोपी हा पुण्यातून पसार झाला होता व त्याचा शोध पुण्याचे जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागामार्फेत घेण्यात येत होता. दरम्यान, सदर व्यवसायिक आरोपी हा त्याच्या उत्तर प्रदेशातील मुळगावी गेल्याची माहिती जीएसटी विभागाच्या पथकास मिळाली. त्यानुसार जीएसटी विभागाच्या अन्वेष्ण शाखेचे एक पथक उत्तर प्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्हयात जबजुआ गावी जाऊन त्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेऊन स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्यास जेरबंद करण्यात आले. त्यानंतर चौधरी यास पोलीसांनी पुण्यात आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
COMMENTS