Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकाराम भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

श्रीगोंदा : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्या

फराह खान आणि साजिद खानने घेतले साईसमधीचे दर्शन 
काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करा…
स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकर्‍यांसाठी आपले जीवन समर्पित केले : पोपटराव पवार

श्रीगोंदा : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील पार्वतीवाडी जि प शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भंडारे यांना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र रोहीत वाकचौरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य, श्रीरामपूर पंचायत समितीच्या मा सभापती वंदनाताई मुरकुटे, संस्थेचे अध्यक्ष अर्जून राऊत यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे होते. यावेळी स्वच्छता कामगारांचाही सन्मान करण्यात आला. तुकाराम भंडारे यांनी आपल्या शाळेत परसबाग, स्वयंअध्ययन गट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शंभर टक्के प्रगत शाळा, स्वच्छता अभियान, मिशन आपुलकीतून लोक सहभाग व त्यातून भौतिक सुविधा, माता पालक प्रबोधन, बोधकथेतून संस्कार आदि नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आबासाहेब दळवी, राधाकिसन बोरकर, राजेश पाटील, बाबा काळबुघे, संभाजी औटी, राजेंद कोकणे, हभप भैरट महाराज, अर्जुन मुरकुटे, तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, सिताराम भुजबळ, केंद्रप्रमुख हनुमंत भुकन व पालकांनी अभिनंदन केले.

COMMENTS