Homeताज्या बातम्यासंपादकीय

ट्रक चालक आणि कायदा

केंद्र सरकारने नुकत्याच हिवाळी अधिवेशनात केलेल्या नव्या मोटार वाहन कायद्यात अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. शिवा

राजकारणाचा खरा चेहरा
सीमाप्रश्‍नांचा वाढता गुंता
लोकसंख्यावाढ रोखण्याचे आव्हान

केंद्र सरकारने नुकत्याच हिवाळी अधिवेशनात केलेल्या नव्या मोटार वाहन कायद्यात अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. शिवाय या प्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या तरतुदीला आक्षेप घेत ट्रकचालकांनी देशभर तीन दिवसांचा संप पुकारला आहे. खरंतर देशात यापूर्वी देखील हिट अँड रन कायदा अस्तित्वात होता. या कायद्यात मात्र भारतीय दंड संहितेच्या आयपीसी कलम 304-अ अंतर्गत जो कुणी अविचारी आणि निष्काळजी कृत्यामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल त्याला दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा सुनावण्यात येत असत. मात्र केंद्राला यापेक्षा प्रभावी कायदा करण्याची गरज भासली आणि त्यांनी तो केला. या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारत देशभरातील इंधन पुरवठा बंद केल्यामुळे मंगळवारी देशभरातील इंधन पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्यामुळे आणि अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र यानिमित्ताने या कायद्याची चर्चा होणे अपेक्षित आहे. ट्रक चालकांनी या कायद्यावरच आक्षेप घेतला आहे, आणि त्यातील तरतुदी बदण्याची मागणी केली आहे. खरंतर आजमितीस देशात सर्वाधिक मृत्यू अपघातात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरंतर केंद्राने वाहतुकीसंदर्भातील कायदे प्रभावी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. अखेर सरकारने हिट अ‍ॅड रन घटनांशी कायदे केले आहेत. त्यामुळे आता या कायद्यातील लवचिकता संपलेली आहे. हा कायदा कठोर आणि जुलमी झालेला दिसून येत आहे. हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात एखाद्या ट्रकचालकाचा दोष नसला तरी, त्याला या कायद्याने कठोर शिक्षा होणार आहे. खरंतर ट्रकचालक काही गर्भश्रीमंत नसतात, त्यामुळे अनवधनाने त्यांच्याकडून अपघात घडल्यास त्यांना केवळ कठोर शिक्षेला सामौरे जावे लागणार आहे. त्यांना त्यांच्या बचावासाठी महागडा वकीण घेणे, त्याची फीस देणे, याबाबी त्यांना परवडणार्‍या नाहीत, त्यामुळे ट्रकचालकांना 10 वर्ष शिक्षेची आणि दंड झाल्यास तो पैसा आणायचा कुठून ही भीती आहे. शिवाय होणार्‍या कारावासाच्या भीतीने पुढील आयुष्य देखील तुरुंगात काढण्याची भीती त्यांना व्यक्त करावी लागते. त्यामुळे अनवधनाने झालेल्या चुकीमुळे किंवा न घडलेल्य चुकीमुळे देखील संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होवू शकते, शिवाय ट्रकचालकांचे कुटुंब इतकेही श्रीमंत नाही की ते कोर्टातील केसेस चांगल्या पद्धतीने लढू शकतील, शिवाय ट्रकचालकांचे कुटुंब उघड्यावर येण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारी निदर्शने केली. उनवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रकचालकांनी आंदोलन केले मात्र सुरुवातीला शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाने नंतर हिंसक वळण घेतले. यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलीच शिवाय लाठ्या काठ्यांनी पोलिसांना मारहाण केली यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर अतिरिक्त बळ पोहचताच पोलिसांनी केलेल्या कारवाईत पन्नास पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतले होते. ट्रक चालकांनी सोमवारी अचानक बंद पुकारल्याने सुमारे जेएनपीए परिसरात 25 हजारपेक्षा अधिक वाहने थांबली. त्यामुळे जेएनपीएमधील पाचही बंदरातील मालवाहतुकीवर परिणाम झाला होता.  ट्रकचालकांच्या आंदोलकांमध्ये कुठली संघटना वा राजकीय पक्षाचे नेतृत्व नव्हते. त्यामुळे चर्चा करायची कुणाशी हा पेच पोलिसांसह प्रशासनापुढे होता. गॅसचे वितरण सोमवारी सकाळपासून ठप्प झाले. सुमारे 1200 टँकरचालक संपात सहभागी झाले आहेत. प्रशासन, पोलीस व इंधन कंपनी व्यवस्थापनांनी वाहतूकदार संघटनांशी चर्चा करूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे इंधन तुटवड्यामुळे मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता आहे.

COMMENTS