Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रक चालकांच्या आंदोलनास हिंसक वळण

राज्यात इंधन पुरवठा कोलमडण्याची भीती

मुंबई ः केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याविरोधात पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणार्‍या चालक काल सोमवारपासून संपावर गेल्यामुळे राज्यातील इं

राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन
पीएचडी करुन दिवे लावणार का ?
 ’बाप्पाला पत्र ’ स्पर्धेत श्रीज्या मोहन रासकर सर्वप्रथम

मुंबई ः केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याविरोधात पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणार्‍या चालक काल सोमवारपासून संपावर गेल्यामुळे राज्यातील इंधन पुरवठा कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सलग 3 दिवस हा संप चालणार आहे. याशिवाय या आंदोलकांनी सोमवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आंदोलन केले, यावेळी आंदेालकांनी चक्क पोलिसांवरच लाठीमार केला, शिवाय त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे.

या आंदोलनातमहाराष्ट्रातील सर्वच टँकर चालकांनी यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. याचा प्रत्येय मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आला आहे. या ठिकाणी सकाळपासूनच 10 ते 15 किलोमीटर लांब वाहनांची राग लांगली आहे. केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्यात अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षा व साडे 7 लाखांच्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल. या तरतुदीला देशभरातील ट्रक व टँकर चालकांनी विरोध केला आहे. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकर चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी या प्रकरणी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मनमाड डेपोतून सोमवारी एकही टँकर बाहेर पडले नाही. यामुळे येथून होणारा इंधनाचा पुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. टँकर चालकांचा हा संप मिटला नाही. तर राज्यात पेट्रोल-डिझेलचे वांदे होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या कथित वादग्रस्त कायद्याला बीपीसीएल, एचपीसीएल व इंडिया ऑयल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांनी विरोध केला आहे. त्यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी घोडबंदर येथील फाऊन्टन हॅाटेलजवळ चक्का जाम आंदोलन केले. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. टँकर चालकांच्या या संपामुळे मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्ट्रातील पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची शक्यता आहे.

मुंबइर्त टायर जाळून केला निषेध – नालासोपार्‍यात ट्रक चालकांनी रस्त्यावर टायर्स जाळून आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणेला विरोध केला. यावेळी त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली.

आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक, काठ्यांनी मारहाण – नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरु होते. सोमवारी सकाळी साडे अकरा-बारापर्यंत सदर आंदोलन सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याला विरोध करणार्‍या पोलिसांवर ट्रक चालकांनी हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर एका पोलिसाला चक्क काठीने मारहाण केली. या पोलिसाने पळ काढल्यामुळे हा पोलिस थोडक्यात बचावला. काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या.

COMMENTS