Homeताज्या बातम्यासंपादकीय

ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 

केंद्र सरकारने केलेल्या तीन भारतीय संहिता कायद्याच्या अंतर्गत, त्यातील तपशिलांवर आता मतभेद उभारू लागले आहेत. याचा परिणाम आज देशभरातल्या अनेक राज्

संसदेतही सडकावरचे अनुकरण!
संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!
आण्याचे नारळ काय कामाचं !

केंद्र सरकारने केलेल्या तीन भारतीय संहिता कायद्याच्या अंतर्गत, त्यातील तपशिलांवर आता मतभेद उभारू लागले आहेत. याचा परिणाम आज देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये दिसून आला. विशेषत: भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट काँग्रेस या संघटनेने बंद पुकारला. देशातील अनेक राज्यांचे रस्ते चक्काजाम होऊन बंद पडले. देशातील २८ लाख पेक्षा अधिक ट्रकांचे जवळपास ८० लाख ड्रायव्हर या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर ट्रक मालक देखील या बंदमध्ये सहभागी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचं कारण असं की नव्याने करण्यात आलेल्या भारतीय कायदा संहितेच्या अंतर्गत हिट अँड रन या कलमांमध्ये एखादा ड्रायव्हर हिट किंवा ठोस देऊन पळून जात असेल तर, त्याला सात लाख रुपयाचा दंड आणि दहा वर्षाची कैदेची शिक्षा नमूद करण्यात आली आहे. देशातील ८० लाख ट्रक ड्रायव्हरांचं यावर असलेलं मत म्हणजे, सर्वसाधारणपणे महिन्याला दहा हजार कमावणारा ट्रक ड्रायव्हर सात लाख रुपये नेमका आणणार कुठून? त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर जर त्याच ठिकाणी थांबला तर तो माॅब लिंचींगचाही शिकार होऊ शकतो. त्याचबरोबर देशातील रस्ते अजूनही पूर्णपणे विकसित झालेले नसताना, केले जाणारे कायदे हे केवळ एकतर्फी अन्याय करणारे आहेत, अशी ट्रक ड्रायव्हरांची भूमिका आहे. महाराष्ट्रात देखील नवी मुंबई आणि जेएनपीटी परिसरात ट्रक चालकांचे आंदोलन झालं आणि त्यामध्ये काही प्रमाणात हिंसेचे गालबोट लागले. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या सगळ्याच राज्यांमध्ये आज ट्रक ड्रायव्हर संघटनेने बंद पुकारला. परिणामी ट्रक एकाच जागेवर थांबून आहेत. परंतु, यामुळे भाजीपाला, दूध आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीची कमतरता निर्माण झाल्यामुळे बाजारपेठेवर देखील याचा परिणाम होईल, असे एकंदरीत चित्र उभे राहिले आहे. अर्थात, भारतीय कायदा संहितेच्या अनुषंगाने जी जी कलमे आहेत त्यावर अजूनही पूर्णपणे अभ्यास व्हायचा बाकी असल्याने, आणि त्यावर ते ते घटक व्यक्त व्हायचे बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भारतीय कायदा संहितेची नेमकी मर्यादा काय आहे, यावर देखील काही बाबी स्पष्ट होतील. सध्या तरी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या संघटनेने देशभर पुकारलेल्या या बंद मधून एक गोष्ट नक्कीच दिसते आहे की, देशातील जवळपास एक कोटी लोक म्हणजे ट्रक ड्रायव्हर या संपात सहभागी झाले आहेत. ट्रक ड्रायव्हर यांची ही संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर यांचे हे आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास संघटनेमधून व्यक्त केला जातो आहे. अर्थात, ट्रक ड्रायव्हरच्या संदर्भात यापूर्वीही हीट & रन चा कायदा होताच. त्या कायद्याचा खरा उपयोग होताना दिसत नाही. अर्थात, ट्रक चालक यांच्यातही विविध प्रवृत्ती आहेत. काहीजण ड्रायव्हिंग चे नियम पाळून चालतात, तर काहीजण अगदी बेदरकारपणे चालतात. शिवाय खाजगी ट्रक्स वर शिफ्ट पद्धत फार कमी असल्यामुळे, बऱ्याच वेळा एकच ड्रायव्हर पंधरा पंधरा तास गाडी चालवतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांना निमंत्रण मिळते. शिवाय अलीकडे एक्सप्रेस वे, महामार्ग असे विविध अत्याधुनिक मार्ग तयार झाल्याचे दावे आणि प्रत्यक्षात झाले असले तरीही, प्रत्यक्ष त्या ठिकाणी रस्त्यांवर वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात खाचखळगे, खड्डे असतात. त्यामुळे पूर्णपणे तांत्रिक पद्धतीने रस्ते परिपूर्ण असतीलच, असे नाही. शिवाय, अपघातांचे प्रमाण कमी करायचे असेल तर रस्ते हे चांगले तयार झाले पाहिजेत. वेग मर्यादा सांभाळण्यासाठी सगळ्यांना समान कायदे लागू करायला हवे.

COMMENTS