Homeताज्या बातम्यादेश

त्रिपुरा, मेघालयसह नागालँड निवडणुकीचा बिगुल वाजला

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणुक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये 16 फेब्रु

राज्य उत्पादन शुल्क विभागात 667 पदे भरणार ः मंत्री देसाई
स्वस्तातील साखरेचा मोह पडला महागात, अडीच लाख लुटले
६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणुक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील. या निवडणुकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 60 विधानसभेच्या जागा असून, बहुमताचा आकडा 31 आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, तिन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांचा सहभाग जास्त आहे, येथे निवडणूक काळात हिंसाचाराच्या घटना आजपोवेतो कमीच राहल्या. निष्पक्ष निवडणुकांसाठी आम्ही व आमची यंत्रणा या ठिकाणी कटिबद्ध आहोत.
मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. तर त्रिपुरा राज्यात  2018 मध्ये 59 जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. 35 जागा मिळाल्या. डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता.

COMMENTS