Homeताज्या बातम्यादेश

तृणमूलने केले लोकसभेचे 42 उमेदवार जाहीर

युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांना उमेदवारी

कोलकाता ः भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवाराची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँगे्रसने देखील 39 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर तृणमूल काँगे्रसने रव

ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ | पहा Lok News24
लातूरमधील आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

कोलकाता ः भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवाराची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँगे्रसने देखील 39 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर तृणमूल काँगे्रसने रविवारी पश्‍चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात पक्षाने क्रिकेटर युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने बशीरहाटमधून अभिनेत्री नुसरत जहाँचे तिकीट रद्द केले आहे.
याशिवाय कूचबिहारमधून जगदीशचंद्र बसू, अलीपुरद्वारमधून प्रकाश चिक बराईक, जलपाईगुडीतून निर्मल चंद्र रॉय, दार्जिलिंगमधून गोपाल लामा, रायगंजमधून कृष्णा कल्याणी, बालूरघाटमधून बिप्लब मित्रा, मालदा उत्तरमधून प्रसून बॅनर्जी, दक्षिणमधून शाहनवाज अली रेहान, कूचबिहारमधून निवडून आले. जंगीपूरचे खलीलूर रहमान, बेहरामपूरचे युसूफ पठाण, कृष्णानगरचे महुआ मोईत्रा, राणाघाटचे मुकुटमणी अधिकारी, दमदममधून सौगता राय, बीरभूममधून शताब्दी राय, हुगळीतून रचना बॅनर्जी, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, जश्‍नपूरचे सयोनी आणि दुर्गापूरमधून कीर्ती आझाद आणि डायमंड हार्बरमधून अभिषेक बॅनर्जी यांना संधी देण्यात आली आहे.  कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसची रॅली घेत आहेत. त्याला जन गर्जन सभा असे नाव देण्यात आले आहे. टीएमसीचे सरचिटणीस आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हेदेखील ब्रिगेड मैदानावर उपस्थित आहेत. या रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आज मी बंगालच्या 42 लोकसभा जागांसाठी तृणमूलचे 42 उमेदवार पुढे आणणार आहे. ममता विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा एक भाग आहे, परंतु त्यांनी याआधीच राज्यातील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार शुभेंदू अधिकारी म्हणाले की, ही टीएमसीची निरोप रॅली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा नायनाट होईल. टीएमसीचे नेते गुंड आणि भ्रष्ट आहेत. त्याची पडझड सुरू झाली आहे. संदेशखाली येथे मेळावा घेण्याचे भाजपचे नियोजन असल्याचे अधिकारी यांनी सांगितले.

COMMENTS