Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, दि. ८ : महाराष्ट्र विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला. दिवंगत शिवाजीरा

सचिव भांगेंना पैश्यापुढे नातेवाईकही दिसेना
पुण्यात पाच कोटींचे अंमली पदार्थ जप्त
नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र, कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण

नागपूर, दि. ८ : महाराष्ट्र विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला.

दिवंगत शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोंसा, राजीव देशमुख आणि श्रीमती निर्मला ठोकळ या लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी शिक्षण, सहकार, शेती, क्रीडा, जलसंधारण, उद्योग, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. या दिवंगत सदस्यांनी विधानसभा/लोकसभा, पालिका, जिल्हा परिषद, सहकारी संस्था, शिक्षणसंस्था यामधून दीर्घकाळ जनसेवा केली. त्यांच्या निधनामुळे राज्याची अपरिमित हानी झाल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी नमूद केले. शोक प्रस्ताव मंजूर करताना सदस्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS