Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुभेदार विठ्ठल जेजुरकर यांना वृक्षारोपण करून श्रद्धांजली

राहाता ः राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आज दहेगाव खटकळी पाट येथे राहाता गावचे सुपुत्र शहीद सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजुरकर यांच्या दशक्रिया

नगर अर्बन निवडणुकीत निरुत्साह.. अवघे 32 टक्के मतदान
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन सुरू
दिव्याखाली अंधार… चोरांनी दाखवला पोलिसांना हिसका ; पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचीच वाहने असुरक्षित

राहाता ः राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आज दहेगाव खटकळी पाट येथे राहाता गावचे सुपुत्र शहीद सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजुरकर यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते 12 फुटी वट वृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय सैन्यात सुभेदार पदी कार्यरत असलेले विठ्ठल जेजूरकर यांचे 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.राहाता अमरधाम येथे सैनिकी व सरकारी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आला.
जेजुरकर यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत साईयोग फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी भाऊसाहेब जेजुरकर, रामचंद्र जेजुरकर, वसंत जेजुरकर, सुरेश जेजुरकर, प्रवीण जेजुरकर, संदीप जेजुरकर, निरंजन जेजुरकर पार्वताबाई जेजुरकर, सत्यभामा जेजुरकर, रुक्मिणी जेजुरकर, रूपाली जेजुरकर, आयुष जेजुरकर, आकांक्षा जेजुरकर आदी शहीद विठ्ठल जेजुरकर यांचे नातेवाईक तसेच साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, डॉ. पांडुरंग गुंजाळ, दशरथ तुपे, अरुण मोकळ, अ‍ॅड.गोरख दंडवते, संदीप डांगे, भाऊसाहेब बनकर, संजय बाबर, मनोज पिपाडा, विलास वाळेकर, विष्णू गाडेकर, उज्वला गाडेकर, रवींद्र धस, व्यंकटेश अहिरे, अनिल सातव, शिवाजी पोटे, संजय बाबर, दीपक दंडवते, संजय वाघमारे, दीपक गाडेकर, विठ्ठल निर्मळ, बबलू फटांगरे, प्रकाश पुंड, नामदेव गवते, सुनील गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS